कडप्पा येथे कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये आंध्रच्या वामशी कृष्णाने एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स खेचले.
वामशी कृष्णाने रेल्वेचा फिरकीपटू दमनदीप सिंगच्या एका षटकात 6 षटकार मारले अन् 64 चेंडूत 110 धावा केल्या.
वामशी कृष्णाने असा रेकॉर्ड करत युवराज सिंगच्या यादीत नाव मिळवलंय. मात्र, 6 बॉलवर 6 सिक्स मारणारे इतर तीन खेळाडू तुम्हाला माहितीये का?
रवी शास्त्री यांनी 10 ऑगस्ट 1985 रोजी बडोद्याविरुद्धच्या रणजी सामन्यात 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारले होते.
रवी शास्त्री यांनी तिलक राज यांना टार्गेट करत एका षटकात सहा षटकार ठोकले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा झाली होती.
तर 19 सप्टेंबर 2007 रोजी टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला 6 सिक्स मारून इंग्लंडचा माज उतरवला होता.
युवराजच नाही तर ऋतुराज गायकवाडने 2022 साली विजय हजारे ट्रॉफीमध्ये इतिहास रचला होता. त्याने एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स मारले होते.
युपीच्या शिवा सिंगविरुद्ध एका षटकात सात षटकार ठोकले. ओव्हरमध्ये एक नो बॉलही टाकण्यात आला ज्यावर गायकवाडने निर्दयीपणे खणखणीत सिक्स मारला.