माजी सिलेक्टर्सचा गौप्यस्फोट, म्हणाले...
WTC फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर कर्णधारपदावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
भारतीय संघाने 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या रूपात शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.
तेव्हापासून आतापर्यंत एकूण 5 आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे
मर्यादित ओवरच्या क्रिकेटमध्ये भारताला तीन ICC ट्रॉफी जिंकून देणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.
धोनीला कर्णधार बनवण्यामागचं कारण काय होतं? यावर माजी सिलेक्टर्स भूपिंदर सिंग यांनी मोठं वक्तव्य केलंय.
संघातील स्वयंचलित निवडीव्यतिरिक्त, तुम्ही खेळाडूचे क्रिकेट कौशल्य, त्याची देहबोली, नेतृत्व क्षमता आणि मनुष्य व्यवस्थापन कौशल्ये पाहता, असं सिंग म्हणतात.
आम्ही धोनीचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्याची देहबोली, तो इतरांशी बोलण्याची पद्धत पाहिली आणि आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, असं भूपिंदर सिंग यांनी म्हटलंय.
पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, आता पुन्हा एकदा भारतीय कर्णधारपदाची चर्चा रंगल्याचं दिसतंय.