भारत आणि साऊथ अफ्रिका फायनलपूर्वी आता सर्वांची धाकधूक वाढली आहे. अशातच आता राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.
राहुल द्रविड यांच्यासाठी वर्ल्ड कप जिंकायला हवा, असं बरेच जण म्हणतायेत, त्यावर तुमचं मत काय? असा सवाल हेड कोचला विचारला गेला.
द्रविडने यावर उत्तर दिलं... मी या गोष्टीच्या विरोधात आहे. आयुष्यात मी जी तत्व पाळतो, ती यामध्ये बसत नाही, असं द्रविड म्हणतो.
कोणासाठी तरी हा वर्ल्ड कप जिंकावा, असा माझा विश्वास नाही. हा एक सांघिक खेळ आहे. कोणा एकट्याचा नाही, असंही द्रविडने म्हटलंय.
कोणा एका व्यक्तीसाठी वर्ल्ड कप जिंकावा, या गोष्टीच्या मी विरोधात आहे. कारण ही गोष्ट मला मान्य नाही, असं स्पष्ट मत द्रविड यांनी नोंदवलं आहे.
वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, त्यासाठी मैदानात तुम्हाला उत्तम खेळ दाखवावा लागेल, असंही द्रविड म्हणाले.