झहीरच्या घरातील देवघर पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का! पत्नी सागरिका म्हणाली...

लक्ष्मी पूजनानिमित्त शेअर केले फोटो

चक दे इंडिया फेम अभिनेत्री सागरिका घाटगेने सोशल मीडियावर लक्ष्मी पूजनानिमित्त शेअर केलेले काही फोटो चर्चेत आहेत.

झहीरबरोबरचे फोटो

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची पत्नी असलेल्या सागरिकाने त्यांच्या घरातील तसेच देवघरातील काही फोटो शेअर केले आहेत.

फोटो चर्चेत असण्याचं कारण वेगळं

सागरिका अनेकदा पती झहीरबरोबरचे फोटो शेअर करते. मात्र यंदा शेअर केलेले फोटो चर्चेत असण्याचं कारण वेगळच आहे.

लक्ष्मी देवीचा आशिर्वाद...

लक्ष्मी पूजन अशी कॅप्शन सागरिकाने या फोटोला दिली आहे. 'लक्ष्मी देवीचा आशिर्वाद तुमच्यावर राहू दे आणि तिच्या कृपीने तुमच्या घरात संपत्ती येवो,' असं सागरिका म्हणाली आहे.

घरातील मोठं देवघर

सागरिकाच्या फोटोमध्ये झहीर खानच्या घरातील देवघर दिसत आहे.

हिंदू देवी-देवता आणि कुराण एकत्र

या देवघरामध्ये लक्ष्मी, गणपती यासारख्या हिंदू देवी-देवतांबरोबरच इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ असलेलं कुरणही दिसत आहे.

अनेकांनी केलं कौतुक

अनेकांनी या फोटोंवर देव्हाऱ्यात कुराण आणि हिंदू देवी-देवतांचे फोटो एकत्र असल्याचं पाहून आनंद वाटल्याचं म्हटलं आहे.

2017 साली विवाहबंधनात

सागरिका आणि झहीर खान 2017 साली विवाहबंधनात अडकले.

VIEW ALL

Read Next Story