राजवर्धन हंगरगेकर

प्लेईंग 11 मध्ये हंगरगेकरला संधी मिळाली. हंगरगेकर मागील आयपीएल हंगामातही चेन्नई संघासोबत होता मात्र, तो बेंचवर होता. पण यावेळी आयपीएल 2023 मध्ये हंगरगेकरला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं.

Apr 03,2023

दीपक चहर

मध्यम-गती गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याने 2018 च्या VIVO IPL सीझनमध्ये पॉवरप्ले दरम्यान मोठ्या प्रमाणावर गोलंदाजी करताना 12 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. तेव्हापासून तो धोनीचा खास गोलंदाज बनलाय.

मिचेल सँटनर

मिचेल सँटनरने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 59 वनडे खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 826 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 27.53 होती, त्याची सर्वोच्च धावसंख्या 67 आहे.

एमएस धोनी (कर्णधार)

महेंद्र सिंग धोनी आयपीएलचं पहिलं सीजन म्हणजेच 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करत आहे. धोनीने कर्णधार म्हणून आतापर्यंत एकूण 210 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 13 सामन्यांत विजय संपादन केलं आहे.

शिवम दुबे

आधीच्या खेळीत अष्टपैलू शिवम दुबेची 18 चेंडूत 19 धावांची संथ खेळी सीएसकेला महागात पडली. त्याने मोहम्मद शमीच्या चेंडूवर 97 मीटर लांब षटकार ठोकला खरा, परंतु पुढच्याच बॉलवर पुन्हा जेलब्रेक शॉट घेण्याच्या प्रयत्नात त्याला झटका बसला.

रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक. चेन्नईच्या संघासाठी दुसरा मोठा खेळाडू आहे. धोनीच्या अनुपस्थितीत जडेजाकडे जबाबदारी दिली जाते.

मोईन अली

इंग्लिश अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali) बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत त्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. धोनीच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा राहिलाय. आगामी आयपीएलमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची ठरेल.

अंबाती रायुडू

अंबाती रायडू हा एक स्टाईलिश मधल्या फळीतील फलंदाज आहे. 33 वर्षाच्या रायडूने 2018 च्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याचा अनुभव धोनीसाठी महत्त्वाचा ठरेल.

बेन स्टोक्स

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मिनी लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही.

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्जकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा दुसरा फलंदाज ठरला आहे. चेन्नईकडून खेळताना एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मुरली विजयच्या नावावर आहे, ज्याने २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११ षटकार ठोकले होते.

डेव्हॉन कॉनवे

डेव्हनने 2009 साली गौतेंग क्रिकेट संघात सामील झाल्यावर व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि ऑगस्ट 2015 मध्ये त्याची 2015 आफ्रिका टी-20 चषकासाठी निवड झाली. आणि आता इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.

VIEW ALL

Read Next Story