6,6,6,6... 'या' फलंदाजाने सूर्याचाही विक्रम मोडला

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला सामना ब्रायन लारा स्टेडिअमवर खेळवण्यात आला.

या सामन्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेवर सात विकेटने दमदार विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला तो निकोलस पूरन.

निकोलस पूरनने अवघ्या 26 चेंडूत 65 धावा केल्या. यात तब्बल सात षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.

आपल्या आक्रमक खेळीत निकोलस पूरनने सामन्याच्या 12 व्या षटकात नांदे ओव्हरच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकले.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकरांच्या यादीत पूरनने सूर्यकुमार यादवला मागे टाकलं आहे. सूर्याच्या नावावर 136 तर पूरनच्या नावावर 139 षटकार आहेत.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 205 षटकार लगावलेत.

आयपीएलमध्ये निकोलस पूरन लखनऊ सुपर जायंट्स संघातून खेळतो. पूरनने आयपीएलमध्ये 76 सामन्यात 1769 धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story