भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान बारबाडोसमध्ये दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी बीचवर धमालमस्ती केली.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचे काही फोटो शेअरक केले आहेत.

हार्दिक पांड्या आणि काही खेळाडूंनी बीचवर व्हॉलीबॉलचा आनंद लुटला. यावेळी हार्दिकने कोट्यवधी किमतीचं घड्याळ घातलं होतं.

हार्दिकने आपल्या घड्याळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचं हे घड्याळ प्रचंड महागडं आहे

या घडाळ्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पांड्याने हातात घातलेलं हे घड्याळ Patek Philippe Nautilus Platinum 5711 या महागड्या ब्रँडचं घड्याळ घातलं होतं.

काही रिपोर्ट्सनुसार हे घड्याळ पाच कोटी रुपयांचं असल्याचा दावा करण्यता आला होता. पण पांड्याने स्वत:च या घड्याळाची किंमत सांगितली आहे.

सोशल मीडियावर या घड्याळाची खोटी किंमत पसरवली जात असल्याचं त्याने म्हटलंय. हे घड्याळ 5 कोटी नाही तर दीड कोटी रुपयांचं असल्याचं त्याने सांगितलं.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याने 5 धावा केल्या, तर एक विकेटही घेतली होती.

एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 5 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचं नेतृत्वा हार्दिक पांड्या करणार आहे

VIEW ALL

Read Next Story