पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष

सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ मोठ्या काळापासून भारतीय टीमपासून दूर आहे.

टीम इंडियापासून दूर

23 वर्षांच्या पृथ्वी जुलै 2021 नंतर भारतीय क्रिकेट संघासाठी एकही सामना खेळला नाही

पुनरागमनासाठी प्रयत्न

टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी पृथ्वी शॉ जोरदार प्रयत्न करतोय, त्यासाठी त्याचा जोरदार सराव सुरु आहे.

काऊंटी क्रिकेटमध्ये खेळणार

आता पृथ्वी शॉने इंग्लंडमधल्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

काऊंटी क्लबबरोबर करार

पृथ्वी शॉने नॉर्थम्पटनशायरबरोबर करार केला आहे. याची अधिकृत घोषणा तो लवकरच करणार आहे

रॉयल लंडन वन डे खेळणार

काऊंटी क्रिकेट दरम्यान पृथ्वी चार दिवसीय मालिका आणि रॉयल लंडन वन डे कपमध्येही खेळणार आहे.

दिग्गजांच्या पंक्तीत सामील

पृथ्वी शॉ आधी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे हे देखील नॉर्थम्पटनशायर संघाकडून खेळले आहेत.

आयपीएलमध्ये फ्लॉप

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पृथ्वी शॉला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती.

युवा खेळाडूंचं आव्हान

त्यामुळे त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. संघातील इतर युवा खेळाडूंचं त्याच्यासमोर आता आव्हान असणार आहे.

टीम इंडियासाठी कामगिरी

पृथ्वी शॉ टीम इंडियासाटी 5 कसोटी सामने, 6 एकदिवसीय आणि एक टी20 सामना खेळलाय

VIEW ALL

Read Next Story