टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताकडे थोडेच आंतरराष्ट्रीय टी20 सामने उरले आहेत. ज्यात टीम इंडियाला कर्णधारासह 15 खेळाडूंची निवड करायची आहे.
बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंना टी20 क्रिकेटपासून दूर ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतही रोहित-विराट खेळले नाहीत.
त्यामुळे टी20 विश्वचषकातया दोघांची निवड होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर हार्दिक पांड्याचं अद्यापही टीम इंडियात कमबॅक झालेलं नाही.
अशात टी20 विश्वचषकात टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी मिस्टर-360 अर्थात सूर्यकुमार यादवच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
सूर्यकुमारच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली.
पाठोपाठ दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तीन सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशा बरोबरीत सोडवली. त्यातच शेवटच्या सामन्यात सूर्यकुमारने शतक झळकावत कॅप्टन इनिंग खेळी केली.
सूर्यकुमार यादवने भारतासाठी 60 टी20 सामन्यात तब्बल 2141 धावा केल्या आहेत. यात चार शतकं आणि तब्बल 17 शतकांचा समावेश आहे.
जानेवारी 2024 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेत हार्दीक पांड्या कमबॅक करण्याची शक्यता आहे. पण सूर्यकुमारची टी0 मधली कामगिरी पाहता कर्णधारपदाची माळ त्याच्यात गळ्यात पडण्याची शक्यता आहे.