भारतीय क्रिकेट संघाला ज्या तीन खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकून दिला होता, तेच तीन खेळा़डू आता भारताविरुद्ध खेळणार आहेत.

या तीन खेळाडूंची नावं आहेत उन्मुक्त चंद, हरमीत सिंह आणि स्मित पटेल. हे तीनही खेळाडू टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिकेच्या संघातून खेळताना दिसणार आहेत.

या तीनही खेळाडूंना अमेरिका क्रिकेट बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळालं आहे. इतकंच नाही तर उन्मुक्त चंद टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिका क्रिकेट संघाचं नेतृत्वही करणार आहे.

उन्मुक्त चंद, हरमीत सिंह आणि स्मित पटेल या खेळाडूंनी 2012 मध्ये टीम इंडियाला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला होता.

या तीनही खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये आपापल्या राज्याकडून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. पण टीम इंडियात त्यांना संधी मिळाली नाही.

टीम इंडियाचे दरवाजे न उघडल्याने उन्मुक्त चंद, हरमीत सिंह आणि स्मित पटेल यांनी अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

आता हे तीनही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेत. रोहितच्या संघाला आता उन्मुक्तचं संघ टक्कर देणार आहे.

VIEW ALL

Read Next Story