आयपीएलच्या नव्या हंगामातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची कर्णधारपदावरुन केलेली उचलबांग़डी

Dec 18,2023


मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. पण या निर्णयामुळे मुंबई इंडियन्से फॅन्स चांगलेच नाराज झाले आहेत.


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी 2023 हे वर्ष अनलकी ठरलं आहे. एक-दोनदा नाही तर तब्बल चारवेळा मोठ्या स्पर्धेत त्याला अपयशाचा सामना करावा लागला


सर्वात पहिलं म्हणजे आयपीएल 2023 च्या क्वालिफाय सामन्यात रोहितच्या मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मुंबईचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.


त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्विकारावा लागला.


रोहित शर्मासाठी या वर्षात सर्वात वाईट प्रसंग ठरला तो म्हणजे 2023 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला


रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने विश्वचषकात सलग 10 सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने 7 विकेटने टीम इंडियावर मात केली.


आणि आता वर्ष संपता संपता मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं. आता आयपीएलमध्ये तो एक खेळा़डू म्हणून खेळताना दिसेल.

VIEW ALL

Read Next Story