पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू मोईन खानचा मुलगा आझम खान सध्या ग्लोबल टी20 कॅनाडा स्पर्धेत खेळतोय.
आझम खान पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पण यात त्याला केवळ 7 धावा करता आल्या.
आझम खानचं वजन तब्बल 140 किलो होतं. यावरुन तो अनेकेवळा ट्रोलही झाला.
पण यानंतर त्याने बरीच मेहनत घेतली आणि तब्बल 30 किलो वजन कमी केलं.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत आझम खानने अनेक मॅचविनिंग खेळी केल्या आहेत.
पाकिस्तानी सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडियेटर्स संघाकडून खेळताना त्याने 42 चेंडूत 97 धावा केल्या होत्या.
आझम खान फलंदाजीबरोबर विकेटकिपिंगही करतो. त्याच्या विकेट किपिंगचा अंदाज क्रिकेट चाहत्यांना चांगलाच आवडतो.
वजनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेस्ट इंडिजचा रहकीम कॉर्नवालही 140 किलो वजनाचा आहे.