पाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीवर INDIA नाव, जाणून घ्या काय आहे प्रकरण
एशिया कप स्पर्धेनंतर पुढच्याच महिन्यात एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा भारत या स्पर्धेचे आयोजक असून 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
Aug 29,2023
एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाची नवी जर्सी लाँच केली आहे. या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पाकिस्तानच्या या जर्सीचं वैशिष्ट्य म्हणजे यावर इंडिया नाव छापण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची जर्सी चर्चेचा विषय बनली आहे.
पाकिस्तानच्या जर्सीवर इंडिया नाव छापण्याचं कारण म्हणजे यंदा भारत वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यामुळे यजमान देशाचं नाव जर्सीवर छापण्याचा नियम आहे.
या नियमानुसार एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापण्यात आलं आहे. कारण एशिया कप स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे.
एशिया कप 2023 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान 2 सप्टेंबरला सामना रंगणार आहे. श्रीलंकेतल्या कँडी इथं हा सामना खेळवला जाणार आहे.
एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 3 वेळा आमने सामने येऊ शकतात. ग्रुप सामना, त्यानंतर सुपर-4 राऊंड आणि अंतिम सामन्यात या दोन संघांमध्ये लढत होऊ शकते.
एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया कर्नाटकच्या अलूरमध्ये कसून सराव करत आहे. 30 तारखेला भारतीय क्रिकेट संघ एशिया कप स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना होईल.