18 देशांचा प्रवास केल्यानंतर आयसीसी वन डे वर्ल्ड कप ट्रॉफी आगरा इथल्या प्रसिद्ध ताजमहलमध्ये पोहोचली आहे. इथं ताजमहलसमोर ट्रॉफीचं फोटोशूट करण्यात आलं.

Aug 16,2023


सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या या वर्ल्ड कप ट्रॉफिचं डिझाईन लंडनमधल्या पॉल मार्डसेन ऑफ गार्ड एंड कंपनीने केलं आहे.


तब्बल 12 वर्षांतर एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन भारतात होत आहे. 5 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.


ताजमहलमध्ये आयसीसी ट्रॉफी पाहण्यासाटी पर्यटकांची एकच गर्दी झाली. काही पर्यटकांनी ट्ऱॉफीबरोबर सेल्फीही घेतल्या.


यंदा आयसीसी ट्रॉफी अमेरिकेच्या प्रायव्हेट स्पेस एजन्सीच्या मदतीने अंतराळात पाठवण्यात आली होती. तिथे या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं.


त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये ट्रॉफी आणण्यात आली. त्यानंतर ही ट्रॉफी 18 देशांचा प्रवास करुन पुन्हा भारतात आली आहे.


आता ही ट्रॉफी भारताच्या विविध शहरात फिरवण्यात येईल. 4 सप्टेंबरला या ट्ऱॉफीचा प्रवास थांबवण्यात येईल.

VIEW ALL

Read Next Story