भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. पुरुष टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत-पाक संघ आमने सामने आले होते.
आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. पण ही टक्कर एशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महिला संघात होणार आहे.
महिला एशिया कपचं शेड्यूल्ड जाहीर करण्यात आलं आहे. गतविजेत्या भारताचा पहिला सामना 19 जुलैला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी रंगणार आहे.
एशिया कप स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. 19 जुलै ते 28 जुलैदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. यात एशियातले आठ संघ सहभागी होणार आहेत.
आठ संघांचे दोन ग्रुप बनवण्या आले आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि नेपाळ संघांचा समावेश आहे.
तर दुसऱ्या ग्रुपमधअये श्रीलंका, बांगलादेश, थाईलँड आणि मलेशिया संघांचा समावेश आहे.
वेळापत्रकानुसार टीम इंडियाचा पाकिस्ताननंतर दुसरा सामना 21 जुलै युएईबरोबर तर 23 जुलैला नेपाळबरोबर तिसरा सामना रंगेल.