मोठ्या प्रतिक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने झुंजार खेळी केली. अवघ्या 48 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं.
सर्फराज खानने अर्धशतक पूर्ण करताच पॅव्हेलिअनमध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीची रिअॅक्शन पाहाण्यासारखी होती. तीने फ्लाईंग किस देत आनंद साजरा केला.
सर्फराज खानने 66 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यात त्याने 1 षटकार आणि 9 चौकार लगावले. सर्फराज दुर्देवीरित्या रनआऊट झाला.
रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे सर्फराज खान रनआऊट झाला. यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला. त्याने आपली कॅप जमिनीवर फेकली.
राजकोट कसोटी सामन्यात सर्फराज खान आणि ध्रुव जुरेशने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सर्फराज खान भारतीय संघात पदार्पम करणारा 311 वा तर जुरेल 312 वा खेळाडू ठरला.
सर्फराज खानला कसोटी कॅप मिळाल्यानंतर त्याची पत्नी रोमाना भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. सर्फराजने तिचे अश्रू पुसले.
सर्फराज खानचे वडिल नौशाद खान यांनी सर्फराजच्या टेस्ट कॅपचं प्रेमाने चुंबन घेतलं. यावेळी त्यांनाही अश्रु अनावर झाले.