मुंबईच्या वानखेडे मैदानावर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. सचिन तेंडुलकर स्टँडजवळचा हा पुतळा उभारण्यात आला आहे.

सचिन तेंडुलकरचा आवडता स्ट्रेट ड्राईव्ह शॉट खेळतानाचा हा पुतळा आहे. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआचे खजिनदार आशिष शेलार उपस्थित होते.

सचिन तेंडुलकरचा हा पुर्णाकृती पुतळा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळ यांनी तयार केला आहे.

सचिन तेंडुलकरचा हा पुतळा 14 फूट उंच आहे. आधी हा पुतळा एमसीए क्लबमध्ये ठेवला जाणार होता. पण एमसीए अधिकाऱ्यांनी हा पुतळा स्टेडिअममध्ये उभारण्याचा निर्णय घेतला.

सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी त्याची खेळतानाची पोझ हवी होती. यासाठी प्रमोद कांबळे यांनी अनेक फोटो, व्हिडिओ पाहिले. शेवटची सचिनचा आवडता स्ट्रेट ड्राईव्हची पोझ फायनल करण्यात आली.

सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. क्रिकेटमधल्या या योगदानासाठी सचिनचा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

VIEW ALL

Read Next Story