आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चर्चेत आला आहे.

महेंद्रसिंग धोनीचा एक लूक व्हायरल झाला आहे. यात धोनी चक्क म्हातारा झालेला दिसतोय.

वास्तविक धोनीची ही एक जाहीरात आहे. यात धोनी तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही भूमिका साकारतना दिसतोय.

धोनीची ही जाहीरात आयपीएलची आहे. या जाहीरातीत वृद्ध धोनी तरुण धोनीला छातीत दुखत असल्याचं सांगतो.

त्यानंतर दोघं अॅम्ब्युलन्समधून रुग्णालायाकडे निघतात. या दरम्यान दोघंही मोबाईलवर आयपीएलचा सामना पाहताना दिसतायत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यानंतर एमएस धोनी थेट चेन्नईला रवाना झाला. तिथे त्याने संघाबरोबर सरावालाही सुरुवात केली.

आयपीएल 2024 मध्ये धोनीच्या चेन्नई सुपरि किंगचा पहिला सामना 22 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध रंगणार आहे. चेन्नई गतविजेता संघ आहे.

VIEW ALL

Read Next Story