आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2024 वर टीम इंडियाने नावर कोरलं. आणि त्याचबरोबर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला
राहुल द्रविडनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गंभीरचा कार्यकाल सुरु होईल.
पण तुम्हाला माहित आहे का भारतीय क्रिकेट संघाचे पहिल प्रशिक्षक कोण होते?
भारतीय क्रिकेट संघाचे पहिले प्रशिक्षक होते बिशन सिंह बेदी (1990-91). त्यावेळी अझरुद्दीन कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार होता
बिशन सिंह बेदी यांच्या आधी भारतीय संघात मॅनेजरची नियुक्ती केली जात होती. 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मानसिंह भारतीय संघाचे मॅनेजर होते.
बिशन सिंह बेदी यांच्यानंतर अब्बास अली यांनी प्रशिक्षकपदाचा कार्यभार सांभाळला. बेग हे 1991-92 दरम्यान टीम इंडियाचे प्रशिक्षक होते.
त्यानंतर 1992 ते 1996 दरम्यान अजित वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची कमान सांभाळली. वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने सलग 14 कसोटी सामने जिंकले.
1996 मध्ये काही काळासाठी संदीप पाटील हे टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. पण इंग्लंड दौऱ्यात खराब कामगिरीनंतर त्यांना हटवण्यात आलं.
त्यानंतर संदीप पाटील यांच्या जागी मदनलाल यांच्यावर जबाबादारी सोपवण्यात आली. मदनलाल 1996-97 असा एक वर्ष प्रशिक्षक होते.
अंशुमान गायकावाड दोनवेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक नबले. पहिल्यांदा 1997-99 अशी दोन वर्ष त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 2000 मध्ये काही काळासाठी त्यांना प्रशिक्षक बनवण्यात आलं