एशिया कप 2023 स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही देशांनी संघाची घोषणा केली आहे.
बांगलादेशनेही संघाची घोषणा केली आहे. या दरम्यान बांगलादेश संघातील एका खेळाडूचा पेटत्या निखाऱ्यावर अनवाणी चालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मोहम्मद नईम शेख असं या खेळाडूचं नाव असून बांगलादेश संघाचा तो महत्त्वाचा फलंदाज आहे. व्हिडिओमध्ये तो पेटत्या निखाऱ्यावर चालताना दिसत आहे.
नईम खानचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. पण हा माईंड ट्रेनिंगचा एक भाग असल्याचा दावा त्याने केला आहे.
सैफ अहमद नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सैफ अहमद बांगलादेश संघाचा सोशल मीडिया मॅनेजर आहे.
हा क्रिकेटर बंगालची काळी जादू करतोय, अशी ट्रेनिंग करण्यापेक्षा त्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावं अशा कमेंट्स युजर्सने दिल्या आहेत.
बांगलादेश संघाने 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. शाकिब अल हसनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. नईम खान या संघात आहे.
नईम खान बांगलादेशसाठी आतापर्य एक कसोटी, 4 एकदिवसीय आणि 35 टी20 सामने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 24 तर टी0 सामन्यात 815 धावा केल्या आहेत.
एशिया कप 2023 स्पर्धेत बांगलादेशचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध 31 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. तर 3 सप्टेंबरला बांगलादेश दुसरा सामना खेळेल.
येत्या 30 ऑगस्टपासून एशिया कप 2023 स्पर्धेला सुरुवात होणार असून पाकिस्तान आणि श्रीलंकेत स्पर्धेतले सामने खेळवले जाणार आहेत.