भारताचा हेड कोच गौतम गंभीर हा अनेकांसाठी प्रेरणा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्यात रस असतो.
गौतम गंभीर हेड कोच म्हणून सध्या टीम इंडिया सोबत कानपूर दौऱ्यावर आहे.
गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत एअरपोर्टवर उतरला तेव्हा एका फोटोमध्ये त्याच्या मोबाईलवरील वॉलपेपर दिसले.
गंभीरने त्याच्या फोनच्या वॉलपेपरवर भगतसिंह यांचा फोटो लावला होता. इन्स्टंट बॉलिवूड या सोशल मीडिया पेजने या संदर्भात माहिती दिली आहे.
भगतसिंह हे भारताचे महान क्रांतिकारी असून त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 साली झाला होता.
अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी भारत देशाला स्वातंत्र मिळावे यासाठी बलिदान दिले होते.
गौतम गंभीरवर भगतसिंह यांचा प्रभाव असून त्यांच्या जयंतीच्या पाच दिवस आधी गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट करून 'द मॅन, द मिथ, द ग्रेटेस्ट... असे लिहिले होते'.
तर 28 सप्टेंबर रोजी सुद्धा गंभीरने भगतसिंह यांचा फोटो पोस्ट करून 'एक 23 वर्षांचा मुलगा जुन्या ब्रिटिश साम्राज्याचा पाया हलवू शकतो!' असे लिहिले.