बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.

या करारात खेळाडूंची ए+, ए, बी आणि सी या श्रेणीत विभागणी करण्यात येते.

ग्रेड ए+ मध्ये फक्त 4 खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये रोहित, विराट, बुमराह आणि जडेजा यांचा समावेश आहे.

या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी मानधन मिळतं.

ग्रेड ए मध्ये कोणते खेळाडू?

तर ग्रेड एमध्ये आर अश्विन, शमी, सिराज, केएल राहुल, शुभमन आणि पंड्या या 6 खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. त्यांना 5 कोटी मानधन मिळणार आहे.

ग्रेड बी: 3 कोटी

सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

ग्रेड सी: 1 कोटी

रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

दरम्यान या करारातून ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वगळण्यात आलं असून, बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story