एशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारलीय. मेन इन ब्ल्यू तब्बल दहाव्यांदा एकदिवसीय एशिया कपच्या अंतिम फेरीत पोहचलीय
सुपर-4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेला धुळ चारत रोहित सेनेने अंतिम फेरीत जागा पक्की केलीय. पण एशिया कपच्या आधीच्या नऊ अंतिम फेरीत टीम इंडियाची कामगिरी कशी होती
एशिया कपच्या गेल्या 9 फायनलपैकी भारतीय क्रिकेट संघाने तब्बल सहा वेळा जेतेपद पटकावलं आहे. आता दहाव्यांदा टीम इंडिया अंतिम फेरीत असून सातव्यांदा जिंकण्यासाठी सज्ज झालीय.
विशेष म्हणजे एशिया कपच्या 9 फायनलपैकी सर्वाधिक म्हणजे आठ वेळा भारत आणि श्रीलंकेदरम्यान सामना रंगला. तर एकवेळा बांगालदेशची मुकाबला करावा लागला.
एकदिवसीय एशिया कपचं सहावेळा जेतेपद पटकावण्याबरोबरच टीम इंडियाने 2016 मध्ये T20 प्रकारात खेळल्या गेलेल्या एशिया कपचं जेतेपदही पटकावलं आहे.
म्हणजे टीम इंडियाने आता एशिया कप जिंकला तर ही आठवी वेळ असेल.
यंदाही एशिया कपच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया फलंदाजी-गोलंदाजीतही वर्चस्व गाजवताना दिसतेय.