सुपर-4 मध्ये तिन्ही पेपर कठीण... जाणून घ्या कधी आणि किती वाजता खेळवले जाणार सामने

अफगाणिस्तान पराभूत

आशिया चषक स्पर्धेमध्ये श्रीलंकेने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला.

2 धावांनी अफगाणिस्तानचा पराभव

अवघ्या 2 धावांनी अफगाणिस्तानचा पराभव झाल्याने 'सुपर-4'चं त्यांचं स्वप्न भंग पावलं आहे.

हे 4 देश ठरले पात्र

भारत, पाकिस्तान, बांगलादेशबरोबरच श्रीलंका 'सुपर-4'साठी पात्र ठरले आहेत.

भारताचे सामने किती तारखेला आणि किती वाजता?

'सुपर-4' फेरीमध्ये भारताचे सामने किती तारखेला आणि किती वाजता आहेत पाहूयात...

पाकिस्तानविरुद्धचा सामना 10 तारखेला

'सुपर-4'मधील भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता सुरु होईल.

श्रीलंकेविरुद्धही भारत खेळणार

त्यानंतर एक दिवसाच्या गॅपने म्हणजेच 12 तारखेला भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाईल. हा सामनाही दुपारी 3 वाजता होणार आहे.

भारताचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध

'सुपर-4'मधील भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामनाही दुपारी 3 वाजताच सुरु होणार आहे.

अंतिम सामना कधी

स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामनाही दुपारी 3 वाजता सुरु होईल.

VIEW ALL

Read Next Story