एशिया कपच्या सुपर-4 सामन्यात टीम इंडियाने श्रालंकेचा पराभव केला. लंकेच्या हातातोंडाशी आलेला विजय भारताने हिसकावून घेतला.

Sep 13,2023


श्रीलंकेने हा सामना गमावला असला तरी लंकेच्या एका खेळाडूने करोडो क्रिकेट प्रेमींची मनं जिंकली. हा खेळाडू आपल्या कामगिरीने चांगलाच चर्चेत आला आहे.


अवघ्या वीस वर्षांच्या दुनिथ वेलालागने (Dunith Wellalage) संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात वेलालागने तब्बल पाच विकेट घेतल्या.


वेलालागेने रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या या भारताच्या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला


भारताविरुद्धच्या या शानदार कामगिरीनंतर सर्वत्र या मिस्ट्री गोलंदाजाची चर्चा आहे. वेलालागे कोण आहे, कुठून आलाय हे जाणून घेण्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.


विशेष म्हणजे इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलमध्ये वेलालागेची एन्ट्री पक्की असल्याचं बोललं जात आहे. वेलालागेला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रांचाईजीमध्ये चढाओढ लागणार आहे.


क्रिकेट चाहत्यांच्यामते आयपीएलच्या पुढच्या हंगामात वेलालागेवर करोडो रुपयांची बोली लागू शकते. विशेषत: चेन्नई आणि बंगळुरु वेलालागेला टार्गेट करु शकतात.


श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने चार विकेट घेत भारताला शानदार विजय मिळून दिला. पण या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला तो वेलालागे

VIEW ALL

Read Next Story