मोईन अलीला निवृत्तीनंतरचा कमबॅक पडला महागात; ICC ने केली मोठी कारवाई

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या अॅशेस सिरीज सुरू असून अॅशेसचा पहिला सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जातोय

या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक केलं.

पण हे कमबॅक मोईन अलीसाठी दुर्दैवी ठरलंय. कारण ICCने मोईन अलीवर मोठी कारवाई केली आहे

आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोईन अलीला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे

दंडासोबतच मोईन अलीच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जमा झाले आहे

अंपायरच्या परवानगीशिवाय मोईन अलीने उजवा हात सुकवण्यासाठी स्प्रे मारला

मोईन आचारसंहिता 2.20 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळलाय.

VIEW ALL

Read Next Story