इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे.
यावेळी मेगा ऑक्शनसाठी 1500 हुन अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती यापैकी 574 खेळाडूंवरच बोली लावण्यात येणार आहे. तर यामधून निवडलेल्या 204 खेळाडूंनाच आयपीएल खेळण्याची संधी मिळेल.
ऑक्शनसाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या 574 खेळाडूंमध्ये अर्जुन तेंडुलकरचा सुद्धा समावेश आहे.
अर्जुन हा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा असून त्याने आतापर्यंत 5 आयपीएल सामने खेळले आहेत.
यापूर्वी अर्जुनला 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने 30 लाखांना विकत घेतले होते. तेव्हा अर्जुनची बेस प्राईज 20 लाख होती.
अर्जुन तेंडुलकरने 2023 मध्ये मुंबईकडून खेळताना केकेआर विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले.
अर्जुनने आतापर्यंत 5 सामन्यात 3 विकेट्स घेतलेले आहेत. मात्र यंदा मुंबईने त्याला रिटेन केले नाही.
अर्जुनला आयपीएल 2024 मध्ये केवळ 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. हा सामना त्याने वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध खेळला.
अर्जुन तेंडुलकरने मेगा ऑक्शन 2025 साठी स्वतःच नाव 30 लाखांच्या बेस प्राईजवर नोंदवलं आहे.