मुंबईच्या संघाने गुरुवारी (14 मार्च 2024) रोजी 42 व्यांदा रणजी (2023-24) जेतेपदावर नाव कोरलं. विदर्भाच्या संघाने मुंबईला कडवी झुंज दिली. मात्र मुंबईने 169 धावांनी विजय मिळवला.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळावलेल्या या विजयामुळे मुंबईचा संघ मालामाल झाला आहे.
90 व्या रणजी स्पर्धेमधील आपली 48 वी फायनल खेळणाऱ्या मुंबईने शेवटच्या दिवशी विजय मिळवला.
रणजी जिंकणाऱ्या संघाला पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सर्वाधिक रक्कम बक्षिस म्हणून दिली गेली.
बीसीसीआयने रणजी विजेत्या टीमच्या बक्षीसाची रक्कम 2 कोटींवरुन 5 कोटी केल्यानंतरची ही पहिलीच स्पर्धा होती.
त्यामुळे मुंबईला रणजीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम म्हणजेच 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही रणजी जिंकणाऱ्या संघाला दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची रक्कम दुप्पटीने वाढवली आहे.
नव्या निर्णयानुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडूनही मुंबईच्या संघाला 5 कोटींचं बक्षीस दिलं जाणार आहे.
त्यामुळेच ही एक स्पर्धा जिंकून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने तब्बल 10 कोटी रुपये बक्षिस स्वरुपात जिंकले आहेत.