बेन स्टोक्सची एक चूक आणि...; BCCI अध्यक्षांनी इंग्लंड टीमला फटकारलं

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच टेस्ट मॅचची सिरीज खेळली जात आहे. या सिरीजचा शेवटचा सामना धर्मशाला येथे सुरू आहे.

इंग्लंडचा संघ पहिल्या इनिंगमध्ये 218 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. यानंतर प्रत्त्युतरात इंडियन टीमने रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या दमदार खेळींच्या मदतीने 450 पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत.

पाचव्या टेस्टच्या आधीच इंडियन टीमने 3-1 च्या फरकाने सिरीज आपल्या नावावर केलेली आहे. यामुळे टीम इंग्लंडच्या हाती निराशा आलेली आहे.

अशातच भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी वक्तव्य केले आहे की, स्टोक्सच्या एका चूकीमूळे पूर्ण इंग्लंडच्या टीमला शिक्षा मिळत आहे.

रॉजर बिन्नी हे बोलले की, बेन स्टोक्सची कॅप्टन्सी पूर्ण सिरीज दरम्यान खूप आक्रामक अंदाजाची बघायला मिळालेली आहे, आणि मला असे वाटते की इंग्लंडच्या पराभवामागेपण हेच कारण आहे.

बिन्नी बोलले की, एवढ्या आक्रामक अंदाजात भारतामध्ये इंडियन स्पिनर्सचा सामना करणं पण इंग्लंडच्या खराब प्रदर्शनाचे एक कारण असू शकते.

बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी इंग्लंडच्या टीमला या विधानांद्वारे वॉर्निंग दिलेली आहे आणि नंतर म्हटले आहे की, इंग्लंडला सामन्याचा स्थितीनुसार खेळण्याची गरज आहे.

VIEW ALL

Read Next Story