रथ सप्तमीच्या व्रतात मीठ का खाऊ नये?

Feb 16,2024

मकर संक्रांतीला सुरु झालेल्या हळदी कुंकू समारंभाची सांगता होते.

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला रथ सप्तमीचं व्रत केलं जातं.

रथ सप्तमीला भानु सप्तमी, अचला सप्तमी आणि संतान सप्तमी या नावानेही ओळखली जाते.

रथ सप्तमीला सूर्यदेवाची पूजा करण्यात येते. असं म्हणतात रथ सप्तमीला सूर्यदेव रथावर स्वार होऊन पृथ्वीतलावर येतात.

अशीही मान्यता आहे की यादिवशी पहिल्यांदा पृथ्वीवर सूर्यप्रकाश पडला होता.

पद्मपुराणात रथ सप्तमीला मीठ खाऊ नये असा उल्लेख आहे. असं केल्यास विशेष पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story