हिंदू धर्मात अक्षता म्हणजे तांदळाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की तांदूळ ही पृथ्वीवर प्रथम लागवड केली गेली होती, म्हणून तांदूळ हे पहिले धान्य मानलं जातं.
हिंदू धर्मात कोणत्याही देवतांची पूजा करताना तांदूळ नक्कीच वापरला जातो.
सगळ्यामध्ये तांदूळ सर्वोत्तम आणि शुद्ध मानला जातो. पांढऱ्या तांदळाचा रंग शांततेचे प्रतीक आहे.
तांदूळ हे पहिले धान्य मानले जाते, कारण तांदूळ ही पृथ्वीवर प्रथमच पिकवली गेली होती.
अक्षता म्हणजे तांदूळ सर्व देवतांना अर्पण केला जातो.
सनातन धर्मात अक्षता किंवा पिवळ्या तांदळाशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही.
अर्पण करताना अक्षता किंवा पिवळा तांदूळ तुटणार नाही याची काळजी घ्या. तुटलेला तांदूळ अशुभ मानला जातो.