नैवेद्याच्या ताटात मीठ का वाढत नाही?
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे.
मीठ हे मीपणाचे, अहंकाराचे प्रतीक मानलं जातं.
निदान तो अहंकार भगवंतापुढे मांडू नये, असं त्यामागील एक कारण आहे.
दुसरं असं म्हटलं जातं की ज्याचा घर आपण मीठ खातो त्याचा मिठाला जागावं.
देवाला आपल्याला कर्माचे फळं द्यायचं असतं. म्हणजे चांगलं केल्यास आशिर्वाद आणि वाईट केल्यास शिक्षा द्यायची असते.
देवाला भक्तांना कर्माची फळ द्यायची असतात. म्हणून त्याला मीठ खायला देत नाहीत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)