मृत्यूची वेळ श्रीरामाने हनुमानाला का फसवलं?

अयोध्येत रामलल्ला यांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. पण तुम्हाला रामाच्या मृत्यूची कथा माहिती आहे का? रामाने मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर हनुमानाला का फसवलं? तुम्हाला माहिती आहे का?

पौराणिक कथेनुसार हनुमानाने यमाला रामाचं प्राण घेऊ दिलं नाही. त्यामुळे श्रीरामांना मृत्यू येणे अशक्य झालं होतं.

त्यामुळे श्रीरामाने हनुमानाचे लक्ष विचलित करण्यासाठी आपली अंगठी एका भेगेमध्ये फेकली. त्या त्यांनी हनुमानजींना आज्ञा दिली की, जा ती अंगठी घेऊन ये.

भेगेतून अंगठी आणण्यासाठी हनुमानाने किड्याचं रूप धारण केलं आणि भेगेच्या आत उडी मारली.

भेगेत उडी मारल्यानंतर तो नागलोकात पोहोचला. तिथे नागलोकच्या राजा वासुकीला हनुमानजीने अंगठी मागितली.

वासुकीने अंगठ्याच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवलं. ते पाहून हनुमानजीला धक्काच बसला कारण तिथे रामाच्या अंगठ्यांचा ढीग होता.

त्यावेळी रामाने हनुमानजीला फसवल्याचं वासुकीने सांगितलं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story