गोपिकांमध्ये रासलीला खेळणारा कृष्ण जितका मोहक वाटतो तितकीच त्याची कृष्णनिती महाभारताताचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
कौरव,पांडव आणि कृष्ण यांच्यातील धर्मासाठी झालेलं युद्धाचा सार व्यास ऋषिंनी महाभारतात लिहलेला आहे.
महाभारतात एकूण 1 लाख श्लोक असून हे श्लोक 100 भागांमध्ये विभागले आहेत.
कृष्णकाळात झालेल्या धर्म युद्धाकाळाला महाभारत असं नाव देण्यात आलं तरी त्याचं मूळ नाव 'जय संहिता' असल्याचं म्हटलं जातं.
शंभर कौरवांच्या विरोधात विजय होण्यासाठी पाच पांडवांचा कृष्ण सारथी होता.
भगवद गीता हा महाभारताचा हिस्सा असून यात धर्मासाठी झालेल्या युद्धातील कृष्णनिती सांगितली जाते.