घराचे बांधकाम आणि त्यात ठेवलेली प्रत्येक गोष्ट कशी असावी हे वास्तूशास्त्रात दिलेलं आहे. घरात पॉझिटिव्ह एनर्जी ठेवण्यासाठी वास्तूशास्त्रला अनन्यसाधारण महत्व आहे.
अगदी सामान्य वाटणाऱ्या काही गोष्टी वास्तूदोष सुद्धा निर्माण करू शकतात. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
अनेक जण घरात चपलांचा स्टॅंड ठेवत असातात, वास्तूशास्त्रानुसार घरात चपला ठेवल्यास लक्ष्मी घरात राहत नाही. विनाकारण खर्च वाढत जातो.
तुमच्या घरात कोणत्याही बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते घरात ठेवू नये. बंद पडलेलं घड्याळ वाईट वेळ दर्शवते असं वास्तूशास्त्रात सांगितलं जातं.
अडगळीच्या वस्तू घराबाहेर काढून टाकाव्यात असं वास्तूशास्त्र सांगतं. अडगळीच्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
शुक्र ग्रह हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो. घरात फाटलेले जुने कपडे असल्यास शुक्र कमजोर होतो, त्यामुळे घरात दारिद्र्य वाढते.
बाथरूम किंवा बेसिनचा नळ लिकेज असल्यास वेळीच दुरूस्त करावा. सतत नळातून गळणारं पाणी हे अधोगतीचं लक्षण मानलं जातं.
वास्तूशास्त्रानुसार फुटलेली काच किंवा तडे गेलेला आरसा घरात ठेवल्याने महत्त्वाची कामं होत नाही.