महाभारत युद्धानंतर जिवंत वाचलेल्या त्या 12 योद्ध्यांचं काय झालं?

May 18,2024

कौरव आणि पांडव्यांमध्ये युद्ध

कुरुक्षेत्रात महाभारत कौरव आणि पांडव्यांमध्ये युद्ध झालं होतं. यात कौरवांकडून 11 अक्षौहिणी सैन्य तर पांडवांकडून 7 अक्षौहिणी सैन्य होतं. एका अक्षौहिनीमध्ये 21870 हत्ती, 21870 रथ, 65610 घोडे आणि 109350 पायदळ अशी गणना करण्यात येते. या युद्धात 12 योद्धे जिवंत होते.

12 योद्धे जिवंत

कृष्ण, पांडव - अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, युयुत्सु, सात्यकि, कृतवर्मा , अश्वत्थामा, कृपाचार्य, वृषकेतु हे जीवंत होते.

कृपाचार्य

कृपाचार्य महाभारत युद्धातून वाचले कारण त्यांना दीर्घायुष्याचा वरदान लाभला होते. तर कृतवर्मा याचं पुढे यादवांच्या युद्धात मृत्यू झाला.

अश्वत्थामा

गुरू द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा कौरवांच्या बाजूने लढला होता. वडिलांचा विश्वासघातामुळे मृत्यू झाल्याच कळताच अश्वत्थामाला राग आला आणि त्याने ब्रह्मास्त्राचा वापर केला. रणभूमीचे स्मशानभूमी झाली. कृष्णाला याचा राग आला आणि त्याने तीन हजार वर्षे कुष्ठरोगी म्हणून जगण्याचा शाप दिला.

युयुत्सू

राजा धृतराष्ट्राचा मुलगा युयुत्सू पांडवांकडून युद्ध लढला. युयुत्सूचे वंशज आजही अस्तित्वात आहेत असं मानलं जातं.

सात्यकी

सात्यकी हा एक यादव योद्धा असून पांडवांकडून लढला आणि यादवांच्या लढाईत सात्यकीने कटवर्माचे शीर कापले आणि तोही मारला गेला होता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story