फ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क.

फ्लॉवर कुठल्याही सिझनमध्ये हमखास मिळतो. पण, थंडीच्या दिवसांत मात्र तो अतिशय चांगला आणि फ्रेश मिळतो.

अनेकांना फ्लॉवर आवडतही नाही. पण असं केल्यानं आरोग्याला अपाय होऊ शकतो. कारण फ्लॉवर खाण्याचे अनेक फायदे आहेत.

शरीरासाठी, फुलकोबी "थंड" मानला जातो. फ्लॉवरचे शरिराला अनेक फायदे आहेत. फ्लॉवरमध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असतं.

शरीरासाठी, फुलकोबी "थंड" मानला जातो. फ्लॉवरचे शरिराला अनेक फायदे आहेत. फ्लॉवरमध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असतं.

फायबर

आपण नेहमी जो आहार खातो त्या तुलनेत फ्लॉवरमध्ये 10 टक्के फायबर जास्त असते. तो खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आदी विविध आजारांचा धोका कमी होतो.

कोलीन

फ्लॉवर खाल्ल्याने तुम्हाला पुरेशा प्रमाणात कोलीन मिळते. त्यामुळे तुमची विचारशक्ती चांगली राहते.

रोगप्रतिकारक शक्ती

लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, फॉस्फरस आणि फ्लोराईड ही खनिजे देखील त्यात असतात. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, फुलकोबीमध्ये बी 1, बी 2, बी 3 आणि बी 5 सारखे जीवनसत्त्वे देखील असतात.

रक्तातील कॅल्शियमची पातळी

रक्तातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि रक्त गोठण्यास फ्लॉवर महत्वाचा आहे.

वजन कमी

फ्लॉवरमध्ये फक्त २५ टक्के कॅलरीज आहेत. फुलकोबी खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते

VIEW ALL

Read Next Story