Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा

Surabhi Jagdish
Jul 31,2024


वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश करण्याचं मुख्य स्त्रोत मानलं जातं.


मुख्य दरवाजाची दिशा योग्य नसल्यास घराची प्रगती थांबू शकते, असं मानलं जातं. चला जाणून घेऊया घराचे मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असावे.


वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजासाठी उत्तर-पूर्व आणि उत्तर दिशा शुभ मानली जातात. या दिशेला दरवाजे लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो.


त्याचप्रमाणे, मुख्य प्रवेशद्वारासाठी पूर्व आणि पश्चिम दिशा देखील शुभ मानली जाते. ही दिशा सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असते. या दिशेला दरवाजे असल्याने कुटुंबात स्वास्थ्य आणि आनंद टिकून राहतो.


वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा दक्षिण, दक्षिण-पश्चिम, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व दिशेला नसावा.


त्याचप्रमाणे मुख्य दरवाजा दक्षिण, नैऋत्य, उत्तर-पश्चिम आणि आग्नेय दिशेला नसावा. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story