फायकस प्लांटदेखील तुळशीजवळ ठेवणे देखील टाळा. हे रोप सभोवतालची ऊर्जा शोषून घेते. लोक आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी याचा वापर करतात. मात्र तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्यास त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जादेखील शोषून घेते.

Apr 22,2023


काही लोक तुळशीसोबत एकाच कुंडीत आकचे रोप लावतात. बऱ्याचदा आकच्या झाडातून दूध बाहेर पडते आणि ते दूध तुळशीच्या रोपावर पडल्यास तुळस खराब होते.


तुळशीच्या रोपासोबत शमीचे रोप लावणार असाल. तर ते किमान चार ते पाच फूट अंतरावर ठेवा. शमीचे रोप शनी दर्शवते आणि शनीची दिशा पश्चिम आहे.


तुळशी शेजारी कधीही निवडुंग लावू नये. निवडुंगाला काटे असतात. त्यामुळे हे राहू-केतूचे प्रतीक मानले जाते.


ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या शेजारी काही विशिष्ट प्रकारची झाडे लावू नयेत. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.


तुळश आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण आपल्यापैकी बरेच जण तुळशीच्या रोपासोबत इतरही झाडे लावतात.


तुळशीचे रोप हिंदू धर्मात लक्ष्मीचे प्रतिरूप मानले जाते. म्हणूनच ही वनस्पती पवित्र मानली जाते आणि सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते.

VIEW ALL

Read Next Story