'या' 7 मूर्ती घरात ठेवा!

पैशाची कमतरता भासणार नाही

वास्तूशास्त्रात घरात कुठल्या वस्तू असाव्यात आणि कुठे ठेवाव्यात जेणे करुन घरात सकारात्मक ऊर्जाचा आवरत होतो हे सांगण्यात आलं आहे. घरातील वास्तूदोषांमुळे घरात त्रास, अडथळे, आजारपण आणि आर्थिक समस्या सतत जाणवतात. त्यामुळे पैशाची कमतरता भासू नये म्हणून घरात 'या' 7 मूर्ती नक्की ठेवा.

गणेश मूर्ती

घरात गणपतीची मूर्ती ठेवणं खूप शुभ मानलं जातं. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तूदोष असल्यास घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवावी.

हत्तीची जोडी

हत्ती हा संपत्ती आणि ऐश्वर्याचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे घरात दोन हत्तीची जोडी कायम ठेवावी. त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो असं म्हणतात.

गाय वासराची मूर्ती

वासराला दूध पाजणाऱ्या गायीची मूर्ती हे घरात ठेवणं शुभ मानलं जातं. ही मूर्ती घरात असल्यास संतत प्राप्तीसोबत मानसिक शांतीसाठी शुभ मानलं जातं.

फिश मूर्ती

फेंगशुईमध्येही मासा खूप शुभ मानला जातो. त्यामुळे घरात फिश आकृतीची मूर्ती किंवा फिश एक्कैरियम तुम्ही

कासव

कासव देवी लक्ष्मीसाठी खूप खास मानला जातो. घराच्या उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवल्यास सुख समृद्धी नांदते.

घोड्याची मूर्ती

वास्तूनुसार धावत्या घोड्याची मूर्ती घरात ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होते अशी मान्यता आहे.

पोपटाची मूर्ती

वास्तूशास्त्रानुसार मुलांच्या खोलीत पोपटाची मूर्ती ठेवल्यास त्यांचं अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते असं म्हणतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story