मित्र-मैत्रिणींच्या किंवा कुटुंबीयांच्या वस्तू वापरणे हे खूपच सामान्य आहे. पण ही सवय चुकीची व घातक ठरु शकते.
वास्तूशास्त्रानुसार, दुसऱ्यांच्या गोष्टी मागून काही गोष्टी वापरणे हे अशुभ मानले जाते.
वास्तूनुसार, या यादीत हाताला बांधण्याच्या घड्याळाचा (Wrist Watch) ही समावेश आहे.
दरम्यान, अनेकदा लोक कोणताही विचार न करता दुसऱ्यांचे घड्याळ वापरतात. पण वास्तुशास्त्रात असं करणे शुभ नसतं.
वास्तुशास्त्रात घड्याळाचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशी जोडला जातो.
वास्तुशास्त्रानुसार, जर एखादा व्यक्ती दुसऱ्यांचे घड्याळ वापरत असेल तर त्याची वाईट वेळ सुरू होते
वास्तुशास्त्रानुसार, घड्याळाबरोबरच रुमालही दुसऱ्यांचा वापरु नये. दुसऱ्या व्यक्तीचा रुमाल वापरल्याने नात्यात दुरावा येतो, अशी मान्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)