धार्मिक मान्यतांनुसार पांडवांनी हिमाचल प्रदेशमधील बगलामुखी मंदिराची स्थापना केली आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक येतात.
असं म्हटलं जातं की, द्वापार युगामध्ये पांडवानी अज्ञातवासात असताना एका रात्रीत हे मंदिर निर्माण केलं होतं.
पांडवांपैकी अर्जुन आणि भीमाने युद्धादरम्यान विशेष शक्ती मिळवण्यासाठी या मंदिरामध्ये बगलामुखी मातेची विशेष पुजा केल्याचंही सांगितलं जातं.
हे मंदिर भाविकांमध्ये शत्रुनाशिनी आणि वाकसिद्धी सारख्या यज्ञांसाठी प्रसिद्ध आहे. येथे होणाऱ्या शत्रुनाशिनी यज्ञामध्ये लाल मिर्चीची आहुती दिली जाते.
असं म्हणतात की बगलामुखी देवी पिवळ्या रंगाच्या पाण्यातून प्रकट झाली होती. त्यामुळेच या देवीला पितांबरी देवीही म्हणतात.
भक्तांची अशी मान्यता आहे की या मंदिरातील बगलामुखी देवीचं दर्शन घेतल्याने कोर्टासंदर्भातील प्रकरणांमधून लवकर सुटका होते किंवा ती प्रकरणं निकाली लागतात.
दिर्घकाळ एखादी व्यक्ती एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टाच्या फेऱ्या मारत असेल तर तिने बगलामुखीचं दर्शन घ्यावं असं सुचवलं जातं.
कोर्ट केस सुरु असलेल्याने या देवीचं दर्शन घेतलं तर निकाल त्याच्या बाजूने लागतो अशी भक्तांची मान्यता आहे.
केवळ सामान्य भक्तच नाही तर बगलामुखी देवीच्या भक्तांमध्ये अनेक नेते आणि कलाकारांचाही समावेश आहे.
मान्यतेनुसार, रावणानेही बगलामुखी देवीची पुजा केली होती.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या दावा केला गेलेला नाही.)