मान्यताः भूतांनी एका रात्रीत बांधलेले शिव मंदिर!


उत्तर प्रदेशात मेरठ जिल्ह्यात दातियाना गावात भगवान शंकराचे एक प्राचीन मंदिर आहे.


याला भूतांचे मंदिर किंवा लाल मंदिर असेही म्हटले जाते. भूतांनीच एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची मान्यता आहे.


सूर्योदयापर्यंत मंदिराचे शिखर पूर्ण न झाल्याने, भूतांनी त्यांचे काम अर्धवट सोडले.


त्यानंतर राजा नैन सिंह यांनी मंदिरचे शिखर पूर्ण केले असे सांगितले जाते.


दरवर्षी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची गर्दी पहायला मिळते.


फक्त लाल विटांनी बांधलेल्या या मंदिरात सिमेंट किंवा लोखंड अजिबात वापरलेला नाही.


इतिहासकारांच्या मते, मंदिराचे बांधकाम हे गुप्त काळात केले गेले.


पण भूतांनी या मंदिराचे बांधकाम केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story