(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)
शनी दोष, साडेसाती दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण, बऱ्याचदा काही लहानसहान गोष्टी मात्र दुर्लक्षित राहतात. हीसुद्धा त्यापैकीच एक.
शमीची लहानशी फांदी काळ्या धाग्याला गुंडाळून धारण केल्यास पत्रिकेतील शनिची वाईट दशा दूर होते, आरोग्य सुदृढ राहते.
शमीचं रोप जितकं दाट असतं तितकाच आनंद आणि समृद्धी घरात नांदते अशी धारणा आहे. शिवाय शनीती साडेसातीसुद्धा दूर होते असं म्हटलं जातं.
सर्वगुणसंपन्नता आणि विजयाची अनुभूती शमीचं रोप देतं. हे गुण खुद्द शनिदेवांमध्येच असतात. किंबहुना या इवल्याशा रोपट्यामध्ये नकारात्मकता आणि पाप दूर करण्याची ताकद असते.
शनिदेवासोबतच शमीचीही पूजा केल्यानं साडेसाती आणि घरातील इतर संकटं दूर होतात. असं म्हणतात की या रोपट्यात शनिदेवांचा वास आहे.
तुम्हाला माहितीये का, शमीचं रोप शनिदेवाला अतिशय प्रिय आहे असं सांगितलं जातं. घरात शमीचं रोप लावून त्याची पूजा केल्यास शनिदेवाची कृपा मिळवता येते.
काही रोपं ही कोणत्या न कोणत्या देवतांची प्रतीक असतात, तर काही देवतांना प्रिय असतात. शनिदेवाच्या बातीतही हेच...
तुम्हाला ठाऊक आहे का, वास्तूशास्त्रामध्ये झाडं, रोपंसुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. काही रोपं इतकी शुभ असतात की त्यांचं घरात असणं मोठ्या फायद्याचं असतं.