Sawan Purnima 2023

श्रावण पौर्णिमेला चुकूनही करु नका 'या' चुका!

श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी ही शुभ आणि खास मानली जाते. त्यामुळे श्रावणातील पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे.

पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 11:00:27 वाजेपासून 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजेपर्यंत असणार आहे. याकाळात शास्त्रानुसार कुठल्या गोष्टी करायच्या नसतात ते जाणून घेऊयात

श्रावण पौर्णिमेला भोलेनाथ आणि श्री हरीची पूजा पूजा केली जाते. यादिवशी दान धर्म केल्यास सर्व पापांपासून मुक्ती होते असं म्हणतात.

श्रावण पौर्णिमेला दारु मासंमच्छीचं सेवन करु नये. त्याशिवाय लसूण कांदाही खाऊ नये.

श्रावण पौर्णिमेला कोणाचाही अपमान करु नये आणि कोणत्याही गरीबाला रिकाम्या हाती जाऊ देऊ नये.

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे घालून नये. ही चूक केल्यास आयुष्यात नकारात्मक ऊर्जा राहते.

श्रावण पौर्णिमेला घरात किंवा ऑफिसमध्ये कोणाशीही जोरजोरात भांडू नयेत. त्याशिवाय केस आणि नखे कापू नयेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story