अनेकदा लोक पैसे कमी पडले की एकमेकांकडून उधार घेतात किंवा देतात.
एखाद्याला मदत करणे चांगली गोष्ट आहे. पण काही गोष्टी उधार घेणे आणि वापरणे अशुभ मानले जाते.
लग्न झालेल्या महिलांनी तर या वस्तू अजिबात शेअर करु नयेत. यामुळे नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा येतो.
हिंदू धर्मानुसार, कुंकवाला खूप महत्व आहे, हे महिलांच्या सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
महिलेने आपले कुंकू दुसऱ्या महिलेला देऊ नये.
लग्न झालेल्या महिलेने आपली टिकली दुसऱ्या महिलेला देऊ नये. यामुळे नवरा-बायकोत वाद होतात.
लग्न झालेल्या महिलांनी आपल्या बांगड्या दुसरीला देऊ नयेत. हवे तर तुम्ही त्या दान करु शकता. हे शुभ मानलं जातं.
महिलांनी आपल्या पायातील जोडवी दुसऱ्या महिलेला देऊ नये.
असे केल्यास पती-पत्नीमध्ये भांडणं होतात.
लग्न झालेल्या महिलेसाठी मंगळसूत्र खूप महत्वाचे असते.
त्यामुळे मंगळसूत्र कोणाला देऊ नका आणि दुसऱ्याचे परिधानही करु नका.