किन्नराचा लग्नाबद्दल एक विचित्र प्रथा आहे. किन्नर या फक्त एक रात्रीसाठी वधू बनतात. त्याचा नवरदेव कोण असतो हे जाणून आश्चर्यचकित व्हाल.
महाभारत काळापासून ही परंपरा चालत आली आहे. युद्धाचा वेळी पांडवांनी विजयासाठी विधी करायचा होता. यात कोणाला तरी बलिदान द्यायचं होतं.
अशावेळी स्वत:चा बळी कोण देणार असा प्रश्न असताना अर्जुनचा मुलगा आणि सर्प कन्या उलुपीचा मुलगा इरावनने बळी देण्याच ठरलं.
पण बळी देण्यापूर्वी इरावनच लग्न झाल पाहिजे अशी अट घालण्यात आली. पण इरावनशी लग्न कोण करणार?
अशावेळी श्रीकृष्णाने मोहिनीचं रुप घेऊन इरावनशी लग्न केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इरावनने आपला बळी दिला.
किन्नर समाज इरावणला आपला देव मानतो आणि ते आपल्या इरावण देवतेशी एका रात्रीसाठी लग्न करतात. दुसऱ्या दिवशी त्या विधवा होतात आणि पतीच्या मृत्यूबद्दल शोक करतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)