चाणक्यला भारतातील सर्वात महान विद्वान आणि अर्थतज्ज्ञ मानण्यात आलं आहे. चाणक्यने आपल्या नितीशास्त्रात गुरुचं महत्त्व समजावून सांगितलं आहे.
3 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. यानिमित्ताने चाणक्यने नितीशास्त्रात आपल्या गुरुचा त्याग करण्यास का सांगितलं आहे हे समजून घ्या.
प्रत्येक मुलाचा पहिला गुरु आपले आई-वडील आणि नंतर शिक्षक आणि त्यानंतर आपले अनुभव असतात असं चाणक्य सांगतात.
गुरुशिवाय शिष्याला ज्ञान मिळणं कठीण असल्याने चाणक्यने गुरुला देवाचा दर्जा दिला आहे.
ज्याप्रकारे शिष्याने गुरुकडे स्वत:ला समर्पित केलं पाहिजे, त्याप्रमाणे एका गुरुचंही तितकंच कर्तव्य असतं असं चाणक्य सांगतात.
गुरु शिष्याचं मार्गदर्शन करतो. त्याला चांगलं, वाईटमधील अंतर सांगतो. त्यामुळे गुरु बनवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.
चाणक्य सांगतात की, जर गुरुकडेच विद्या नसेल तर तो शिष्याचा उद्धार कसा करणार? अशा गुरुचा त्याग करणं उचित आहे.
विद्या नसलेल्या गुरुकडून शिक्षा घेतल्याने फक्त आर्थिक हानी होत नाही, तर पूर्ण भविष्यच उद्ध्वस्त होतं.