बृहस्पति दोष असेल तर नोकरी, संपत्ती, संतती सुख आणि वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येता.
गुरु दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज गुरुपौर्णिमेला काही उपाय केल्यास फायदा होतो.
आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आज विष्णूचा अवतार सत्यनारायणाची कथेचं पठण करा.
पिवळे कपडे आणि पिवळ्या वस्तू दान करा. 'ऊँ ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करा.
विद्यार्थ्यांनी पिवळ्या हकीकची माळ घालून 'ऊँ ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नम:' मंत्राचा जप करा.
जोडप्याने गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूला केशर, पिवळं चंदन अर्पण करा आणि गरजूंना गुळाचं दान करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)