आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप! जाणून घ्या मुहूर्त
गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह शिगोला असून आज पाच दिवसांच्या पाहुणाचार घेऊन लाडके बाप्पा आणि गौराई गावाला जाणार आहेत.
भक्त गणेशजींना ढोल-ताशा वाजवत, जड अंतःकरणाने निरोप देणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत बाप्पाच विसर्जन करण्यात येणार आहे. अनेकांकडे गौराई असते त्यांनाही बाप्पासोबत विसर्जत करण्यात येतं.
तुम्हालाही पाचव्या दिवशी म्हणजेच 23 सप्टेंबरला गणेश विसर्जन करायचे असेल तर शुभ मुहूर्त जाणून घ्या.
ज्या लोकांना दुपारी बाप्पाला निरोप द्यायचा असेल त्यासाठी दुपारी 1.43 ते 7.24 पर्यंत विसर्जनाचा शुभ मुहूर्त आहे.
ज्यांना रात्री उशिरा बाप्पाला निरोप द्यायचा आहे ते रात्री 10.44 ते 12.12 या वेळेत गणेश विसर्जन करू शकतात.
गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी विधीनुसार पूजा करून लाडू आणि केळी अर्पण करा. आरती करा आणि गणेशोत्सवादरम्यान झालेल्या चुकांची माफी मागावी. त्यानंतर बाप्पाचं हळुवार विसर्जन करावं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)